Tarun Bharat

मुलांना घाबरवून कमावितो पैसे

‘बॅड अंकल’ नावाने प्रसिद्ध

भारतीय आईवडिल स्वतःच्या मुलांना घाबरविण्यासाठी अनेक गोष्टी सांगत असतात. खोडकर मुलांना सुधारण्यासाठी जगभरात याचीच पुनरावृत्ती होत असते. अनेकदा आईवडिल कुटुंबातील एखाद्या सदस्याची भीती दाखवून मुलांना मनाजोगे वागवत असतात. परंतु चीनमध्ये एक व्यक्ती परिवाराच्याच नव्हे तर अनोळखी लोकांच्या मुलांना घाबरविण्याचे काम करतो आणि यासाठी पैसे देखील आकारतो.

चीनच्या जेजिएंग प्रांतात लिशुई शहर आहे. येथे 30 वर्षीय लुओ किंगजंग हा साधासरळ स्वभाव असलेला व्यक्ती आहे. परंतु लोक त्यांना बॅड अंकल या नावाने ओळखतात. याचे कारण त्याची अजब सेवा आहे. लुओ हा मुलांना घाबरविण्याचे काम करतो. लुओ स्वतःच्या या विचित्र सेवेसाठी पैसे देखील आकारतो. आपले मूल आमचे म्हणणे ऐकत नसल्याची तक्रार आईवडिल अनेकदा करत असतात. अशा स्थितीत मुलांना सुधारण्यासाठी त्यांच्यात भीती निर्माण केली जाते. हीच भीती निर्माण करण्याचे काम लुओ करत असतात.

सर्वप्रथम एका मित्राने स्वतःच्या मुलाला घाबरविण्यासाठी एक व्हिडिओ तयार करून पाठविण्यास सांगितले होते. माझा व्हिडिओ पाहून त्याच्या मुलाच्या वर्तनात खरोखरच बदल झाला. तेव्हापासून अन्य लोकही माझ्याशी संपर्क साधू लागले आणि मी बॅड अंकल ठरलो असे लुओ यांनी सांगितले.

लुओ हे स्वतःच्या व्हिडिओंमध्ये भीतीदायक आणि अजब चेहरा तयार करतात, तो पाहून 5 किंवा त्याहून कमी वयाची मुले घाबरून जातात. लुओ मुलांना कचरा योग्य ठिकाणी फेकणे, वेळेत गृहपाठ करणे, न जेवता झोपी न जाणे यासारख्या गोष्टींसाठी भीती दाखवत असतात. ही पद्धत उपयुक्त ठरत असली तरीही अशाप्रकारे मुलांना घाबरविणे योग्य नसल्याचे बाल मानसोपचार तज्ञांनी म्हणणे आहे.

Related Stories

ब्राझीलमध्ये 50 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

सीमामार्गांनी देशाबाहेर पडण्याची तयारी

Patil_p

ग्रिसमध्ये बोटीला आग, 278 प्रवाशांची सुखरुप सुटका

Patil_p

चक्क कुकरसोबत विवाह, मग घटस्फोट

Patil_p

अमेरिका, दक्षिण कोरियाला निर्दयपणे प्रत्युत्तर देऊ

Patil_p

फुलांनी बहरली दुबई

Patil_p