बेंगळूर
दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत मलाबार गोल्ड आणि डायमंडस् संयुक्त अरब अमिरातमधून (युएइ)25 किलो सोने मागवणारी पहिली भारतीय ज्वेलरी कंपनी ठरली आहे. आर्थिक भागीदारी कराराअंतर्गत (सीइपीए) मलाबारने ही कामगिरी नुकतीच साध्य केली आहे.
भारत आणि युएइ यांच्यातील करारांतर्गत मलाबारने 25 किलो सोन्याची आयात केली आहे. सदरची आयात ही आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून 1 टक्का डय़ुटी सवलतीसह करण्यात आलीय. आयात आणि निर्यात धोरणाखाली डय़ुटीतील लाभाचा पहिल्यांदाच ग्रुपला फायदा उठवता आलाय. दागिन्यांची निर्यात करण्याची परवानगी मिळवण्यात मलाबार यशस्वी ठरलीय. ग्रुपचे चेअरमन एम. पी. अहमद यांनी, आम्ही भारत-युएइच्या भागीदारीतून दागिने आयात आणि निर्यात करण्यात आघाडीवर राहिलो आहोत याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.