शाहुवाडी प्रतिनिधी
मलकापूर बाजार पेठेत प्रथमेश कृष्णात शिंदे वय ९ हा मुलगा बेवारस स्थितीत फिरत असताना शाहूवाडी पोलिसांना आढळला असून याबाबत शाहूवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सदर बालकास बाल संकुल मंगळवार पेठ कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे.
पोलीसातुन मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर बाजार पेठेत बेवारस म्हणून फिरत असलेला प्रथमेश कृष्णात शिंदे हा बालक पोलिसांना बेवारस स्थितीत फिरताना आढळून आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी शोध घेतला असता त्याचे नातेवाईक आढळून आले नाही सध्या बालकास बाल संकुल मंगळवार पेठ कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले असून सदर बालकच्या नातेवाईकांनी शाहूवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी केले आहे.