कोरेगावच्या युवकास अटक
सातारा प्रतिनिधी
कोरेगाव येथील रोहन रघुनाथ पाटील(वय 34) याने 17 वर्षाच्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या दुकानात, महाबळेश्वर, सातारा आदी ठिकाणी बलात्कार केला असून त्याप्रकरणी पाटील याला कोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार रोहन पाटील याचे कोरेगावात सोन्याचे दुकान होते. त्याने पीडित युवतीच्या वडिलांकडे काम शिकण्यासाठी येऊन जवळीक निर्माण केली. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून भुलवले. त्याने तिला आगस्ट 2021 ते सप्टेंबर 2022 पर्यत सातारा, महाबळेश्वर, कोरेगाव येथे बलात्कार केला. लग्नाबाबत विचारणा केली असता तिला पाच वर्षे थांब असे म्हणून टाळू लागला. त्यास अटक केली असून याचा तपास कोरेगाव पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे करत आहेत.