Tarun Bharat

TET परीक्षेत गैरप्रकार, 9500 उमेदवारांवर कारवाई

पुणे / प्रतिनिधी :

शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची संख्या साडेनऊ हजारांवर गेली आहे. 2018 च्या टीईटीत 1 हजार 663 उमेदवारांनी, तर 2019 च्या टीईटीत 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. 2018 च्या परीक्षेत संबंधित उमेदवार अपात्र ठरलेले असतानाही त्यांनी स्वत:ला पात्र करून घेतल्याचे निदर्शनास आले असून, त्यांची या परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी 2018 च्या परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांवरील कारवाईची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला. या गुन्हय़ाच्या अनुषंगाने केलेल्या तपासादरम्यान उमेदवारांच्या गुणपत्रिकांची कसून तपासणी केली असता 1 हजार 663 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. त्यातील 779 उमेदवार अपात्र असताना त्यांनी त्यांच्या गुणांमध्ये फेरफार करून स्वतःला उत्तीर्ण केले, तर 884 उमेदवारांनी आरोपींच्या सहाय्याने बनावट गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचे आढळून आले. या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करून परीक्षा परिषदेने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अधिक वाचा : केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

राज्य परीक्षा परिषदेने 2019 च्या टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यानंतर आता 2018 च्या परीक्षेत 1 हजार 663 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टीईटीत 9 हजार 537 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.

Related Stories

टंकलेखन परीक्षा उत्तीर्णतेसाठी दोन वर्षांची मुदतवाढ

datta jadhav

पुण्यात निर्माणाधीन मॉलच्या स्लॅबची जाळी कोसळून 5 ठार

datta jadhav

पुणे विभागातील 5 लाख 22 हजार 748 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

कोविड सुरक्षा नियम पाळत शाळा, महाविद्यालय सुरु

Tousif Mujawar

पुणे जिल्ह्यात 5.86 लाख ग्राहकांकडून एप्रिलपासून वीजबिलाचा भरणा नाही

Tousif Mujawar

सोलापूर : बार्शी नगरपालिका तिजोरीला कोरोना

Archana Banage