महत्त्वाच्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय
वृत्तसंस्था/ नंदीग्राम
ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नंदीग्राममधील भेकुटिया सहकारी कृषी विकास समितीच्या निवडणुकीत भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभूत केले आहे. या निवडणुकीत भाजपने 12 पैकी 11 जागांवर विजय मिळविला आहे. तर तृणमूलचा केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीवरून नंदीग्राममध्ये तणावाचे वातावरण होते. भाजपच्या विजयानंतर तृणमूलने रस्त्यांवर उतरून निदर्शने केली आहेत. मतदानासाठी बाहेरून लोकांना आणले गेल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. तर भाजपने तृणमूल काँग्रेसचा हा आरोप फेटाळून लावला आहे.