वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबने रियल माद्रिद क्लबकडून खेळणाऱया कॅसेमिरोशी लवकरच नवा करार करणार असल्याची माहिती या क्लबच्या व्यवस्थापकाने दिली.
ला लिगा फुटबॉल स्पर्धेतील चॅम्पियन्स रियल माद्रिद फुटबॉल क्लबकडून कॅसेमिरो यापूर्वी खेळत होता. आता मँचेस्टर युनायटेड कॅसेमिरेबरोबर लवकरच नवा करार करणार आहे. 30 वर्षीय कॅसेमिरोबरोबर मँचेस्टर युनायटेडने चार ते पाच वर्षांसाठी करार करण्याचे निश्चित केले असून या करारापोटी मँचेस्टर युनायटेडला प्रत्येक वर्षी सुमारे 16.1 दशलक्ष डॉलर्सची रक्कम मोजावी लागणार आहे.
मूळ ब्राझीलच्या कॅसेमिरोने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत 63 सामन्यांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर युनायटेड सध्या शेवटच्या स्थानावर आहे. त्याने या स्पर्धेतील आपले दोन्ही सामने गमाविले आहेत. मँचेस्टर युनायटेडचा या स्पर्धेतील पुढील सामना येत्या सोमवारी लिव्हरपूल क्लबविरुद्ध होणार आहे.