Tarun Bharat

मँचेस्टर युनायटेडचा निसटता विजय

वृत्तसंस्था/ साऊदम्पटन (लंडन)

2022-23 प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने यजमान साऊदम्पटनचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल खेळाच्या उत्तरार्धात ब्रुनो फर्नांडिसने नोंदविला.

या स्पर्धेत दोन आठवडय़ापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये ब्रेंटफोर्ड संघाकडून मँचेस्टर युनायटेडला 4-0 असा एकतर्फी पराभवाचा धक्का बसला होता. शनिवारच्या सामन्यात दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला पण मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच राहिला. 55 व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिसने मँचेस्टर युनायटेडचा एकमेव निर्णायक गोल नोंदविला. या विजयामुळे मँचेस्टर युनायटेड संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 6 गुणासह सातव्या स्थानावर आहे. मँचेस्टर युनायटेडने दोन सामने जिंकले असून त्यांचा या स्पर्धेतील पुढील सामना लिसेस्टर बरोबर येत्या गुरुवारी होणार आहे. साऊदम्पटन क्लब केवळ 4 गुणासह चौदाव्या स्थानावर आहे. साऊदम्पटन आणि चेल्सी यांच्यातील सामना मंगळवारी खेळवला जाणार आहे.

Related Stories

अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबरात

Patil_p

विंडीज दौऱयासाठी पाक संघात नसीम, अब्बासचा समावेश

Patil_p

भारतीय फुटबॉल संघात सुनील चेत्रीचे पुनरागमन

Patil_p

वावरिंका सलामी लढतीत गारद

Patil_p

वॉर्नच्या सर्वोत्तम विश्व वनडे संघात सचिन, सेहवागला स्थान

Patil_p

मोहम्मद शमी वनडे मालिकेतून बाहेर

Patil_p