वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूमध्ये 8 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणाऱया 2022 क्रिकेट हंगामातील दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी उत्तर विभाग संघाच्या कर्णधारपदी पंजाबचा आक्रमक फलंदाज मनदीप सिंगची निवड करण्यात आली असून पूर्व विभाग संघाचे कर्णधारपद मनोज तिवारीकडे सोपविण्यात आले आहे.
उत्तर विभाग संघामध्ये यश धुळ, मनन होरा, ध्रुव शोरे, हिमांशू राणा, आकाश वशिष्ठ, अमोल मल्होत्रा, नवदीप सैनी, सिद्धार्थ कौर यांचा समावेश आहे.
उत्तर विभाग संघ- यश धुळ, ध्रुव शोरे (उपकर्णधार), मनन व्होरा, मनदीप सिंग (कर्णधार), हिमांशू राणा, आकाश वशिष्ठ, अनमोल मल्होत्रा, मयांक दागर, पुलकित नारंग नवदीप सैनी, सिद्धार्थ कौर, जगजित सिंग, निशांत सिंधू, कमरान इक्बाल, विकास मिश्रा.
पूर्व विभाग संघ- मनोज तिवारी (कर्णधार), सुदीप घरामी, ए. मुजुमदार, अभिषेक पोरेल, शाहबाज अहमद, इशान पोरेल, आकाश दीप, विराट सिंग (उपकर्णधार), नझीम सिद्दकी, कुमार कुशाग्र, शाहबाज नदीम, मुक्तार हुसेन, रियान पराग, मणीशंकर मुरासिंग आणि शंतनू मिश्रा.