Tarun Bharat

भारताच्या विजयामध्ये मानधना, हरमनप्रितची अर्धशतके

वृत्तसंस्था/ इस्ट लंडन

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून तिरंगी टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विंडीजचा 56 धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रित कौर आणि स्मृती मानधना यांनी शानदार अर्धशतके झळकविली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 2 बाद 167 धावा जमवल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 4 बाद 111 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.

भारताच्या डावामध्ये यास्तिका भाटिया आणि मानधना यांनी सलामीच्या गड्यासाठी 33 धावांची भागीदारी केली. विंडीजच्या करिष्माने भाटियाला 18 धावावर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेली देओल फार वेळ खेळपट्टीवर राहू शकली नाही. ब्रुसच्या गोलंदाजीवर ती पायचित झाली. भारताची स्थिती यावेळी 2 बाद 52 अशी होती. अनुभवी हरमनप्रित कौर आणि मंधाना यांनी तिसऱ्या गड्यासाठी 115 धावांची अभेद्य भागीदारी केली. हरमनप्रितने 35 चेंडूत 8 चौकारासह नाबाद 56 तर स्मृती मंधानाने 10 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 74 धावा झोडपल्या. या तिरंगी मालिकेतील दक्षिण आफ्रिकाविऊद्धच्या पहिल्या सामन्यात मंधाना केवळ 7 धावावर बाद झाली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावामध्ये शिमेनी पॅम्पबेलने 57 चेंडूत 47 धावा जमवल्या. हेली मॅथ्यूजने नाबाद 34 धावांचे योगदान दिले. भारतीय संघातील गोलंदाज 22 वर्षीय राधा यादवने आपल्या 4 षटकात केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद केला. विंडीजची स्थिती 4 बाद 96 अशी होती. त्यावेळी त्यांना 15 चेंडूत विजयासाठी 71 धावांची जऊरी होती. विंडीजने 20 षटकाअखेर 4 बाद 111 धावापर्यंत मजल मारली होती. भारतातर्फे दीप्ती शर्माने 24 धावात 2 तर राधा यादवने 10 धावात एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 2 बाद 167 (स्मृती मानधना नाबाद 74, हरमनप्रित कौर नाबाद 56), विंडीज 20 षटकात 4 बाद 111 (पॅम्पबेल 47, हेली मॅथ्यूज नाबाद 34, दीप्ती शर्मा 2-24, राधा यादव 1-10).

Related Stories

रैनासाठी यापुढे चेन्नई फ्रँचाय झीचे दरवाजे बंद?

Patil_p

मेलबर्न रेनिगेड्सशी उन्मुक्त चंद करारबद्ध

Amit Kulkarni

आयसीसी वनडे सुपरलीग चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया अग्रस्थानी

Patil_p

हिमा दासची पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

Patil_p

मेदव्हेदेव, किरगॉईस, गॉफ, गार्सिया चौथ्या फेरीत

Patil_p

शेवटच्या सामन्यात द.आफ्रिका युवा संघ विजयी

Patil_p