Tarun Bharat

भक्तीपूर्ण वातावरणात झाली मंगाई देवीची यात्रा संपन्न

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या मंगाई देवीची यात्रा मंगळवारी मोठ्या उlसाहात व चैतन्यदायी वातावरणात पार पडली. मंगाई देवीच्या दर्शन व ओटी भरण्यासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. सायंकाळ नंतर वडगाव परिसरात मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतुक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला.

कोरोनामुळे मागील दोन वर्षात यात्रेवर निर्बंध आले होते. मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नव्हता. यावर्षी मात्र निर्बंध हटविण्यात आल्याने यात्रा उत्साहात साजरी करण्याचा निर्णय देवस्थानचे हक्कदार व वडगाव येथील नागरिकांनी घेतला होता.

सोमवारी मंदिराला आकर्षक फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वडगाव परिसरातील सर्वच गल्ल्यांमध्ये स्वागत फलक व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंगळवारी पहाटेपासून भाविकांची रिघ मंदिर परिसरात सुरू झाली. मंदिर पाfरसरात पुजेचे साहित्य, हार, नारळ यांची दुकाने थाटण्यात आली होती.

Related Stories

बसपासकडे विद्यार्थ्यांची पाठ

Amit Kulkarni

पोलीस उपायुक्तपदी पी. व्ही. स्नेहा यांची नियुक्ती

Amit Kulkarni

बेळगाव बसस्थानकात समस्यांचा डोंगर

Amit Kulkarni

शिवाजी महाराज भारतीय लष्कराचे दैवत

Amit Kulkarni

आणखी 59 जणांचे स्वॅब तपासणीसाठी रवाना

Patil_p

अमननगर, बॉक्साईट रोडवरही खबरदारी

Patil_p
error: Content is protected !!