वार्ताहर /पालये
दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज मांदेची नूतन नवी समिती धर्मभूषण परम पूजनीय सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि सामाजिक विभागाकडून निरिक्षण केलेली नवीन समिती सन 2022 ते 2025साठी संत समाज मांदेची नूतन समिती मांदे झोनचे क्षेत्रिय प्रमुख महेश गोडकर व मोप पेडणेचे क्षेत्रिय प्रमुख श्रीराज शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली नियुक्त करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी मंगेश नाईक यांची निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणेः उपाध्यक्ष संजय कोरगावकर, सचिव प्रसाद राऊत, सहसचिव गौरेश कोरगावकर, खजिनदार गुरुदास गडेकर, उपखजिदार वसंत गोवेकर, सदस्य ः मनोज मोरजकर, शिवा कलाशावकर, संजना कोरगावकर.
दरम्यान, सद्गुरु माऊलींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सांप्रदायिक प्रार्थना व दत्तमाला घेण्यात आल्या नंतर क्षेत्रिय प्रमुख महेश गोडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून आपले विचार थोडक्मयात मांडले व नवीन समितीस शुभेच्छा दिल्या.
पेडणे संत समाजाचे धर्मप्रचारक संजय सावळ देसाई यांनी सुंदर मार्गदर्शन केले आणि मावळत्या समितीच्या कार्याबद्दल गोड कौतुक केले तर श्रीराज शेलार यांनी ब्रह्मानंद स्वामींच्या आठवणीना उजाळा दिला. त्यांच्या मांद्रे येथील वास्तव्याचा अनुभवही विषद केला. मांदेचे पुरोहित तथा उद्गाता आनंद म्हामल यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
संत समाज मांद्रेचे कार्य नेटाने पुढे नेऊया, असे मनोगत नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश नाईक यांनी व्यक्त केले. संजय कोरगावकर यांनी आभार मानले. आरती, पसायदानाने बैठकीची सांगता झाली.