विविध जातींच्या आंब्यांचे आकर्षण : नागरिकांचा प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. क्लब रोड येथील हय़ूमपार्कमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते फीत कापून या महोत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे आंबाप्रेमींना एकाच ठिकाणी विविध जातीचे आंबे खरेदी करता येणार आहेत. रविवार दि. 29 मेपर्यंत हा आंबा महोत्सव चालणार आहे.
आंबा उत्पादक शेतकऱयांना चांगला भाव आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून हा महोत्सव भरविण्यात आला आहे. विशेषतः या महोत्सवात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मालवण, देवगड आदी ठिकाणांचे शेतकरी दाखल झाले आहेत. त्यामुळे हापूस, पायरी, निलम आदी जातीच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे. उत्कृष्ट दर्जाचे आंबे वाजवी दरात विक्री होत असल्याने या आंबा महोत्सवाला दरवषी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. या आंबा महोत्सवात देवगड, रत्नागिरी, धारवाड, हुबळी येथील पायरी, हापूससह पंचवीस प्रजातींचे आंबे दाखल झाले आहेत. यामध्ये कोकण सम्राट, रत्ना बारामासी, दशेहरी, गोवा मानकूर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली यासह शुगर फ्री आंबेही पहायला मिळत आहेत.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे आंबा महोत्सवात खंड पडला होता. मात्र यंदा आंबा महोत्सव पुन्हा भरविण्यात आला आहे. 2018 च्या आंबा महोत्सवात 70 टन तर 2019 च्या आंबा महोत्सवात 97 टन आंब्यांची विक्री झाली होती. त्यामुळे यंदादेखील 100 टन हून अधिक आंब्यांची विक्री होईल, अशी अपेक्षा बागायत खात्याने ठेवली आहे. एकाच छताखाली वेगवेगळय़ा जातीचे आंबे उपलब्ध होत असल्याने खवय्यांचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या आंबा महोत्सवात मोठी विक्री होते. यंदा पहिल्यांदाच कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आंबे घेऊन दाखल झाले आहेत. कोकणातील हापूस, पायरी आणि निलम जातींच्या आंब्यांना अधिक मागणी आहे. या महोत्सवात लोणच्याचे आंबेही दाखल झाले आहेत. यालाही ग्राहकांची पसंती वाढत आहे.
आंब्याच्या रोपांची विक्री
या आंबा महोत्सवात विविध जातींच्या आंब्यांबरोबर नावाजलेल्या आंब्यांच्या रोपांची विक्रीही केली जात आहे. साधारण 50 रुपयांपासून रोपांची किंमत आहे. शिवाय मान्सून तोंडावर आल्याने रोपांची विक्रीही होत आहे.
महोत्सवाचा लाभ घ्यावा
आजपासून चार दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांना कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आंब्यांची एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे. नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा.
महांतेश मुरगोड (उपनिर्देशक बागायत खाते)
कोकणातील आंब्यांची चव चाखता येणार
कोकणातील हापूस, निलम आणि शुगर फ्री आंबे आणले आहेत. कर्नाटकातील नागरिकांना कोकणातील आंब्यांची चव चाखता येणार आहे. शिवाय एकाच ठिकाणी आंब्यांची खरेदी करता येणार आहे.
अन्नपूर्णा पाटील (आंबेविपेत्या)