वृत्तसंस्था/ सिंगापूर
येथे सुरू असलेल्या 2023 च्या सिंगापूर स्मॅश आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राला एकेरीत पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. या स्पर्धेत पुरुष विभागात भारताच्या शरथ कमल आणि जी. साथियान यांना यापूर्वीच पहिल्या फेरीत हार पत्करावी लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात स्वीडनच्या लिंडा बर्जस्ट्रॉमने भारताच्या मनिका बात्राचा 3-2 अशा सेट्समध्ये (12-10, 6-11, 10-12, 11-8, 11-13) असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत मनिका बात्रा अर्चना कामत समवेत महिला दुहेरीत खेळणार आहे.