Tarun Bharat

मनीषा रामदास वर्षातील सर्वोत्तम महिला पॅराबॅडमिंटनपटू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे 2022 च्या सर्वोत्तम महिला पॅराबॅडमिंटनपटूचा पुरस्कार भारताच्या मनीषा रामदासला मिळाला आहे. सोमवारी विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे ही घोषणा करण्यात आली.

भारताची महिला पॅराबॅडमिंटनपटू मनीषा रामदासने विश्व पॅराबॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत एसयु-5 प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. या कामगिरीमुळे तिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विश्व बॅडमिंटन फेडरेशनचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारी 17 वर्षीय मनीषा रामदासने 2022 च्या बॅडमिंटन हंगामात विविध स्पर्धांमध्ये 11 सुवर्ण आणि 5 कास्यपदके मिळवली आहेत. या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये भारताच्या नितीया श्री सुमती, मानसी जोशी, सारिना साटोमी, फ्लोरेस आणि जॉरेगुई यांचा समावेश होता. भारताचे पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन प्रमोद भगत आणि थॉमस चषक विजेत्या एच. एस. प्रणॉय यांची हा पुरस्कार मिळवण्याची संधी हुकली. प्रमोद भगतने चालू वर्षामध्ये झालेल्या विश्व पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचे चौथे सुवर्णपदक मिळवले होते. ऑलिम्पिक चॅम्पियक व्हिक्टर ऍक्सेलसन, झेंग वेई आणि हुवांग क्युयांग यांची चालू वर्षीच्या बॅडमिंटन हंगामातील कामगिरी दर्जेदार झाल्याने त्यांना त्यांच्या विभागात विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे वर्षातील सर्वोत्तम बॅडमिंटन पुरस्कार देण्यात आला आहे. विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे सर्वोत्तम पुरुष बॅडमिंटनपटूचा बहुमान व्हिक्टर ऍक्सेलसनने मिळवला असून त्याने 1 नोव्हेंबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखल्याने त्याला हा पुरस्कार देण्यात आला. ऍक्सेलसनने विश्व बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपदाबरोबरच अन्य 9 स्पर्धां जिंकल्या आहेत.

Related Stories

वजनदार

datta jadhav

गुजरात, बेंगळूर बुल्सचे विजय

Patil_p

भारतीय महिला संघाची झुंज निष्फळ

Patil_p

भारतीय महिला सॉफ्टबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत पदार्पण

Patil_p

भारतीय जिम्नॅस्टचे आव्हान पात्र फेरीत समाप्त

Patil_p

नेदरलँडस्चा भारतावर एकतर्फी विजय

Patil_p