बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना खानापूर तालुका शरीरसौष्ठव संघटना व फ्लेक्स जीम यांच्या संयुक्त विद्यमाने फ्लेक्स जिम मर्यादित टॉप टेन शरीरसौष्ठव स्पर्धेत जीमचा मंजुनाथ कडगडागिव याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर फ्लेक्स जीम मर्यादित किताब पटकाविला. खानापूर येथे आयोजित जिम मर्यादित फ्लेक्स स्पर्धेत 20 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन बेंगळूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबाळकर व आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत मंजुनाथ कलगडागिव याने प्रथम क्रमांक, राहुल पारेसाने दुसरा, कार्तिक सुतेरी तृतीय, प्रवीण धामणे चौथा, अनिल पाटील पाचवे, विशाल कुंभार सहावा, धनंजय सुतार सातवा, परशुराम नायक आठवा, सोनू सोंटक्की नववा तर करण सोंटक्कीने दहावा क्रमांक पटकाविला. बेंगळूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबळकर, आमदार डॉ. अंजली निंबाळकर व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक प्रमाणपत्र, पदके, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्धण्णावर, एम. के. गुरव, वासुदेव साखळकर, एम. गंगाधर, नूर मुल्ला, प्रशांत सुगंधी, हेमंत हावळ, नलवडे यांनी काम पाहिले. तर सुनील राऊत यांनी स्टेज मार्शलचे काम बजावले.
Previous Articleखुली स्केटिंग स्पर्धा उत्साहात
Next Article के आर.शेटी, सिगन स्पोर्टस संघ विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.