Tarun Bharat

#MannKiBaat April 2021 : कोरोनाची दुसरी लाट मोठी, पण घाबरु नका -पीएम मोदी

Advertisements

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 76 व्या अॅपिसोडच्या माध्यमातून देशाला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची दुसरी लाट मोठी आहे पण घाबरु नका, असे सांगितले. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश हादरला आहे. अशा या संकटाचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ठेवणं महत्त्वाचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी अनेक आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केली. यात लॅबमधील तंत्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर यांच्याशी देखील पंतप्रधान मोदी बोलले आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेवर मात केली पण दुसऱ्या लाटेने देश हादरला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला आरोग्य तज्ज्ञ आणि त्यांनी दिलेल्या सूचांना प्राधान्य दिले पाहिजे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

MannKiBaat April 2021 महत्त्वाचे मुद्दे :

गावा-गावांमध्ये जागरुकता दिसतेय : नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये गावांमध्ये जागरुकता दिसत आहे. कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत गावातील लोक आग्रही आहेत. कोरोनापासून गावांचं संरक्षण केलं जात आहे. बाहेरुन येणाऱ्या ग्रामस्थांसाठी वेगळ्या सोयी केल्या जात आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

देश एक होऊन लढत आहे: नरेंद्र मोदी

आज आपल्या देशातील आरोग्य सेवेतील लोक, फ्रंटलाईन वर्कर्स दिवस रात्र सेवा करत आहेत. समाजातील इतर लोक मागे राहिलेले नाहीत.देश पुन्हा एकदा एक होऊन कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध लढत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणानं मात केल्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेले: नरेंद्र मोदी

कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणानं मात केल्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेले होते. मात्र, दुसऱ्या लाटेने देशाला धक्का दिला. आपल्याला दुसऱ्या लाटेवर विजय मिळवायचा आहे. कोरोना संदर्भात तज्ञ, औषध उद्योग आणि ऑक्सिजन निर्मिती यावर बैठका घेत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

कॉर्पोरेट क्षेत्रानं कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी व्हावं: नरेंद्र मोदी

देशातील कॉर्पोरेट क्षेत्रानं कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी व्हावं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. भारत सरकार भविष्यामध्येही कोरोना लसीकरणाचा मोफत कार्यक्रम सुरु ठेवेल. राज्यांनी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवतंय: नरेंद्र मोदी

केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकानं कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातील लढ्यामध्ये रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान : नरेंद्र मोदी

कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातील लढ्यामध्ये रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी धन्यवादाची भावना आहे: नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईच्या डॉ.शशांक जोशी यांच्याशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या डॉ.शशांक जोशी यांच्याशी संवाद साधला. आपल्याकडे जगातले सर्वात उत्कृष्ट उपचार उपलब्ध आहेत आपण पाहू शकता की, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सर्वात चांगला आहे. आपण युरोप किंवा अमेरिकेशी तुलना केली तर आमच्याकड़े रूग्ण उपचारांच्या नियमावलीनुसार बरे होत आहेत, असं डॉ शशांक जोशी म्हणाले.

केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली: नरेंद्र मोदी

केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मे पासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

दुसरी लाट मोठी, पण घाबरु नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशातील कोरोना संकट पुन्हा गडद, दुसरी लाट मोठी, पण घाबरु नका. जर तुम्हाला कोणतीही शंका असेल, तर तुम्ही बरोबर सल्ला घ्या, चुकीचा सल्ला घेऊ नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Related Stories

धोका वाढला : जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार पार

Rohan_P

न्यायालय अवमानप्रकरणी प्रशांत भूषण यांना 1 रुपये दंडाची शिक्षा

datta jadhav

‘गुगल’ची भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p

आता सुटका-जामीन ‘फास्टर’

Amit Kulkarni

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास आता ATS करणार; उच्च न्यायालयाचा आदेश

Abhijeet Khandekar

दिल्ली विधानसभा पूर्णपणे पेपरलेस होणार

datta jadhav
error: Content is protected !!