Tarun Bharat

जलक्रीडा सुसूत्रतेसाठी मालवण तालुका जलक्रीडा अध्यक्षपदी मनोज खोबरेकर व शहरअध्यक्षपदी राजेंद्र परुळेकर यांची निवड

Advertisements

मालवण / प्रतिनिधी-

अनधिकृत जलक्रीडा व्यावसायिकांना अधिकृत करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२२ ला जलक्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन व जलक्रीडा व्यावसायिकांची कार्यशाळा हॉटेल श्री महाराज येथे संप्पन झाली .यावेळी १४१ जलक्रीडा व्यावसायिकांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.चालू पर्यटन हंगामात जलक्रीडा व्यवसाय करण्यासाठी पर्यटन संचानालय (DOT),कोकण विभाग.नवी मुंबई महाराष्ट्र यांची परवानगी आवश्यक असणार आहे. यांसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे आयोजित कार्यक्रमास जलक्रीडा व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी जलक्रीडा व्यावसायिकांच्या नोंदणी प्रक्रिया करण्यात आली तसेच प्रशासनाकडे प्रलंबित जलक्रीडा व्यावसायिकांची परवान्याची माहिती घेण्यात आली व चालू पर्यटन जलक्रीडा हंगामात एक दराच्या माध्यमातून व्यवसाय कसा करता येईल ,जलपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित सेवा कशी देता येईल प्रशासन,पर्यटक व व्यावसायिक यांच्यामधील समन्वय साधण्यासाठी नियोजन करण्यात आले .

जलक्रीडा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना व त्यांना सेवा देण्याच्या मोठमोठ्या वल्गना करणारे स्थानिक प्रशासन अजूनही निद्रा अवस्थेत आहे त्यामुळे पर्यटन व्यावसायिक महासंघाने सदर विषयी समन्वयकांची भूमिका घेण्याचे ठरविले असून जलक्रीडेसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुसूत्रतेसाठी तसेच सुरक्षितेसाठी मालवण तालुका जलक्रीडा अध्यक्षपदी श्री मनोज खोबरेकर व मालवण शहरअध्यक्ष श्री राजेंद्र परुळेकर यांची निवड करण्यात आली.

Related Stories

पोलादपूरनजीक दरड कोसळून महामार्ग ठप्प

Patil_p

वंचित बहुजन आघाडी आणि ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लबने पूरग्रस्तांसाठी मदत

NIKHIL_N

अवैध वाळू व्यवसायाकडे प्रशासनाची डोळेझाक!

NIKHIL_N

जांभूळ व्यापारी संकटात

NIKHIL_N

रत्नागिरीत पुन्हा येण्याचे दिदींचे स्वप्न राहिले अधुरे!

Patil_p

दाभोळमधील तिन्ही रेशन दुकानांचे परवाने रद्द

Patil_p
error: Content is protected !!