कोंकणा सेन शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत
दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱया मनोज वाजपेयीने ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमध्ये काम केल्यावर त्याच्या चाहत्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या सीरिजचा दुसरा सीझनही लोकप्रिय ठरल्यावर आता तिसऱया सीझनची प्रतीक्षा चाहते आतुरतेने करत आहेत. परंतु मनोज आता एका नव्या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. ‘सूप’ असे नाव असलेल्या सीरिजमध्ये मनोजसह कोंकणा सेन शर्मा देखील काम करत आहे.


कोंकणाने यात रेस्टॉरंट सुरू करू पाहणाऱया महिलेची भूमिका साकारली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अभिषेक चौबेने केले आहे. यापूर्वी त्याने इश्किया, उडता पंजाब, सोनचिडिया यासारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. मनोज आणि कोंकणासोबत या सीरिजमध्ये नासिर तसेच सयाजी शिंदे हे कलाकार दिसून येणार आहेत.
कोंकणा देखील स्वतःच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. याचमुळे कोंकण अन् मनोज वाजपेयी या कलाकारांची अभिनयाची जुगलबंदी या सीरिजमध्ये दिसून येऊ शकते. तर या सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यातील दृश्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहेत.