Tarun Bharat

महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

ऑनलाईन टीम / मुंबई :

येत्या काही तासात मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलं असतानाच हवामान विभागाने महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. (mansoon yellow alert 9 districts from maharashtra)

सध्या अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज केरळातील पाच जिल्ह्यांमध्येही 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, कोझिकोडे, आणि कन्नूर या जिल्ह्यांना रेड ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासन अलर्ट असून, नागरिकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

OBC Reservation: …तर मी राजीनामा देतो: वडेट्टीवार

Archana Banage

वारणेच्या बंधारे दुरूस्तीसाठी दहा कोटींचा निधी : जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील

Archana Banage

पेट्रोल – डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Tousif Mujawar

‘काँग्रेसमुक्त भारत’ हे ममता-भाजपचे स्वप्न

datta jadhav

लसीचा एकही डोस वाया घालवू नका !

Amit Kulkarni

कोरोना हरतोय…3124 जणांना डिस्चार्ज

Patil_p