प्रतिनिधी /बेळगाव
एअर मार्शल मानवेंद्रसिंग (एअर ऑफीसर कमांडिंग इन चीफ) यांनी सोमवारी सांबरा एअरमन टेनिंग स्कूलला भेट दिली. सांबरा येथे एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी 30 डिसेंबरपासून सुरू होणाऱया अग्निवीर वायु प्रशिक्षणाची माहिती दिली.
एअर मार्शल मानवेंद्रसिंग यांनी टेनिंग स्कूलच्या विविध विभागांना भेट दिली. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱयांशी संवाद साधताना त्यांनी नवतंत्रज्ञानाचा उपयोग प्रशिक्षणात ठेवला पाहिजे तसेच
इलेक्ट्रॉनिक माध्यमांची हाताळणी करता आली पाहिजे, असे सांगितले. नवतंत्रज्ञानामुळे आता सामान्य उमेदवारांनासुद्धा हवाई योद्धे म्हणून आव्हाने स्वीकारणे शक्मय आहे, असे सांगून आपल्या कामाप्रती नि÷ा ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
नवतंत्रज्ञानामुळे आता सामान्य रिप्रुटदेखील हवाई योद्धा बनून भविष्यातील युद्धाची आव्हाने यशस्वीरीत्या पेलेल, असे सांगून आपल्या कामाप्रती प्रशिक्षकांनी नि÷ा ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.