अरमाने गिरिधक नवे संरक्षण सचिव
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्र सरकारने उच्चस्तरीय नोकरशाहीत अनेक फेरबदल केले आहेत. यानुसरा रस्ते परिवहन आणि महामार्ग सचिव अरमाने गिरिधर यांना नवे संरक्षण सचिव म्हणून नेमण्यात आले आहे. गिरिधर हे आंध्रप्रदेश कॅडरच्या 1998 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. 31 ऑक्टोबर रोजी अजय कुमार सेवानिवृत्त झाल्यावर ते संरक्षण विभागाचे सचिवपद सांभाळणार आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अध्यक्ष अलका उपाध्याय या गिरिधर यांच्या जागी नव्या रस्ते परिवहन सचिव असणार आहेत. तर वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा हे नवे महसूल सचिव असतील. भारताचे जनगणन आयुक्त विवेक जोशी हे मल्होत्रा यांच्या जागी वित्तीय सेवा विभागाचे नवे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. तर विवेक जोशी यांच्या स्थानी गृहमंत्रालयातील अतिरिक्त सचिव मृत्युंजल कुमार नारायण हे जनगणना आयुक्त म्हणून काम करणार आहेत. या फेरबदलात केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 16 सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण विकास सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांना नवे इस्पात सचिव म्हणून नियुक्ती मिळाली आहे. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयातील अतिरिक्त सचिव शैलेश कुमार सिंह हे एक डिसेंबरपासून नवे ग्रामीण विकास सचिव असणार आहेत. सध्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे विशेष सचिव अमृतलाल मीणा हे नवे कोळसा सचिव असणार आहेत. राजस्थान कॅडरच्या 1991 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी सुधांश पंत यांना बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातील सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कामरान रिझवी हे अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव असतील. रचना शाह यांना वस्त्राsद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. भूपिंदर सिंह भल्ला हे नुतनीकरणीय ऊर्जा सचिव असणार आहेत.