Tarun Bharat

शिरोळ तालुक्यात पावसाची ‘ही’ आहे परिस्थिती; अनेक मार्ग बंद

Advertisements

 शिरोळ/प्रतिनिधी

मुसळधार पावसाने शिरोळ तालुक्यातील अनेक गावचा संपर्क तुटला आहे. काही भागात पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. शिरोळ  ते नांदणी शिरोळ जुना कुरुंदवाड रस्ता, कनवाड-म्हैसाळ-शिरोळ बंधारा, तेरवाड बंधारा, राजापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दोन दिवस झाले वाऱ्याने तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे नागरिकात भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील 54 पैकी 40 गावांना महापुराचा फटका बसत असल्याने महापुराची धास्ती निर्माण झाले आहे. तर घाट माथ्यावर सुरू असलेल्या पावसाने व राधानगरी वारण, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने कृष्णा,. पंचगंगा, वारणा व दूधगंगा नदीचे पाणी पात्र बाहेर पडले आहे. पुरामुळे शेतातील हाता तोंडाला आलेली पिके कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर वादळी वाऱ्याने ऊस भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यां  शेतकरी चिंतेत आहे.

Related Stories

कोल्हापूर : शियेत आणखी एक पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या दहावर

Abhijeet Shinde

जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करावे लागेल – दौलत देसाई जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

कुंभोज येथे देशी दारू दुकानात चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल चोरीला

Sumit Tambekar

कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या बदनामी करण्यासाठी खोटी फिर्याद – राजेश लाटकर

Abhijeet Shinde

पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच

Abhijeet Shinde

कोल्हापूर : केप्टाचे अनोखे आंदोलन : खासगी क्लास सुरु करण्यास सशर्त परवानगीकडे वेधले सरकारचे लक्ष

Abhijeet Shinde
error: Content is protected !!