Wardha News : धामण जातीचा साप समजून मण्यार जातीच्या सापासोबत खेळताना सापाच्या दंशाने एकाचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात ही घडली आहे. प्रशांत उर्फ बबलू काकडे (वय ४२ वर्षे रा. सानेवाडी) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दोन वर्षांपूर्वी वर्ध्यातील पिंपरी मेघे परिसरात दोन युवकांनी देखील असाच जीव गमावला होता. त्य़ानंतर ही तिसरी घटना घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की,
बबलू काकडे याने गुरुवारी (२९ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी सात वाजता त्याने एका घरातून या मण्यार जातीच्या सापाला पकडलं होतं. परंतु सापाबद्दल फारशी माहिती नसतानाही, हा साप बिनविषारी धामण असल्याची बतावणी करत बबलू काकडे परिसरात फिरला. केवळ फिरलाच नाही तर त्याने मण्यारला चक्क हातात घेऊन खिशात टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेकदा या सापाने त्याला दंश केला. पण सापांबद्दलच्या अज्ञानामुळे त्याने याकडे दुर्लक्ष केलं. मात्र संध्याकाळी त्याला उलटीचा त्रास होवू लागला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्य़ात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
काही नागरिकांनी मोबाईल फोनमध्ये त्याचा व्हिडीओ बनवला. मण्यार सापाशी खेळताचा बबलू काकडेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा बिनविषारी धामण जातीचा साप असल्याचं बबलू या व्हिडीओत लोकांना सांगत असल्याचंही दिसत आहे.


previous post