Tarun Bharat

सीमाप्रश्नावरील सुनावणी लांबणीवर

सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे दावा; उद्याच्या सुनावणीबाबतही अस्पष्टता

नवी दिल्ली, कोल्हापूर- प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात असलेल्या दाव्यावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) सुनावणी होणार होती. पण एक न्यायमूर्ती उपस्थित राहू न शकल्याने सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, आज गुरूवारीही सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून शुक्रवारी सुनावणी होणार की नाही? याबाबत संदिग्धता आहे. आज गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडून शुक्रवारी स्पष्टता होण्याची शक्यता आहे.

सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे तमिळनाडूतील बहुचर्चित जलीकट्टू खेळाच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. सोमवारपासून सलगपणे सुनावणी सुरू झाली आहे. या दाव्यातील सुनावणीत असणारे एक न्यायाधिश सीमाप्रश्नाच्या दाव्यातील खंडपीठात न्यायाधिश आहेत. जलीकट्टूच्या सुनावणीमुळे ते सीमाप्रश्नाच्या सुनावणीत सहभागी होऊ शकलेले नाहीत. बुधवारी ते अनुपस्थित राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही. गुरूवारीही जलीकट्टूच्या याचिकेवरील सुनावणी चालणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी गुरूवारी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी सुनावणी होणार की नाही? याबाबतची स्पष्टता आज गुरूवारी होऊ शकते. ही स्पष्टता झाली नाही तर सुनावणी अनिश्चित काळासाठी पुढे जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Related Stories

एपीएमसी बैठकीत थकीत भाडे वसुलीचा मुद्दा चर्चेत

Amit Kulkarni

कोल्हापूर जिल्हय़ात 1309 पॉझिटिव्ह, 53 बळी

Archana Banage

राष्ट्रीयत्वाची भावना महाराष्ट्राच्या नसानसांत – राष्ट्रपती

Abhijeet Khandekar

आप्पाचीवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध

Patil_p

बेळगाव- बेंगळूर रेल्वेला केवळ 29 टक्केच प्रवासी

Patil_p

डफावर थाप पडण्यापूर्वीच शाहिरांनी घेतला जगाचा निरोप

Archana Banage