ऑनलाईन टीम/तरुण भारत
एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी आंदोलन सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. सोमवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत आता सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले गेले, त्यातून असं निष्पन्न झालं की यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून ५५० घेतले आहेत, असं तपासात निष्पन्न झाले आहे. आता यात आणखीन भर पडली आहे. मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी बेकायदेशीररित्या पैसा गोळा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, वकील सदावर्ते यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की वकील म्हणून आम्ही कोणाकडून एक रुपयाही फी घेतलेली आहे. पण साक्षीदारांचं असं म्हणणं आहे की ५५० रुपये प्रत्येकी म्हणजे पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी १ कोटी ८० लाख रुपये त्यांनी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेले आहेत. असं असताना आता मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठीही गुणरत्न सदावर्ते यांनी बेकायदेशीररित्या पैसा गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रारही सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी बेकायदेशीररित्या पैसा गोळा केला आहे. त्यामुळे सदावर्ते यांनी जमा केलेला पैसा कुठे गेला याची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.कोल्हापुरातील दिलीप पाटील यांनी सदावर्ते यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच न्यायाधीश रणजित मोरे यांचा अवनाम होईल अशी वक्तव्यही सदावर्ते यांनी केल्याचा देखील तक्रारीत उल्लेख केला आहे.