Tarun Bharat

Maratha Kranti Morcha:हाताला सलाईनची सुई असलेला धैर्यशील मानेंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कोल्हापूर \ ऑनलाईन टीम

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आज भर पावसात आंदोलनास सुरुवात झाली. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी हाताला सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झाले होते. त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याच फोटोंची चर्चा रंगली आहे.

कोल्हापुरात भर पावसात आज काळी कपडे तसेच हातात भगवा व तोंडाला मास्क घालून आंदोलक व नेते मंडळी या आंदोलनात सहभागी झाले होते. अशा स्थितीत खासदार धैर्यशील माने आजारी असताना देखील हातात सलाईनची सुई घेऊन सहभागी झाले होते. त्यांच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.

खासदार धैर्यशील माने यांनी यापूर्वीही मराठा आंदोलनात सहभाग घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज देखील धैर्यशील माने हातात सलाईनची सुय घेऊन मराठा आंदोलनात सहभागी झाले. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण लागली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अशक्तपणा असल्याने ते घरात उपचार घेत होते. आशा स्थितीमध्ये देखील ते आज मराठा मोर्चात सहभागी झाले. यासोबतच मराठा आरक्षणाविषयी त्यांनी भूमिका देखील मांडली.

महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चितपणे यशस्वी होईल. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी सांगितले.

Related Stories

कोरोनाचा उद्रेक, कोल्हापूर जिल्हय़ात 11 बळी!

Archana Banage

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

Archana Banage

‘पीएम-किसान’चे कोल्हापूरचे काम असमाधानकारक !

Archana Banage

सावर्डे पाटणकरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

Archana Banage

सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी निगेटिव्ह

Patil_p

शेतकऱयांचा कल आता हंगामी शेतीकडे

Archana Banage