प्रतिनिधी /खानापूर
मराठा मंडळ बेळगाव संचलित मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूल खानापूरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा येथील क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडल्या. या क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याध्यापक पी. एन. मेलगे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून खानापूर तालुक्मयाच्या पीईओ श्रीमती सुरेखा मिरजी व संस्थेचे जेष्ठ संचालक परशराम गुरव आणि शिवाजीराव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या सुरेखा मिरजी यांच्या हस्ते ध्वजारोहण व क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर कुमारी मुक्ता कदम या विद्यार्थीनीने सर्व खेळाडूना खिलाडीवृत्तीने खेळण्याविषयी शपथ देवू केली. प्रास्ताविक के. व्ही. कुलकर्णी यानी केले.
यावेळी पीईओ मिरजी मॅडम यानी खेळांचे महत्त्व पटवून दिले. तर मुख्याध्यापक पी. एन मेलगे यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात, टीव्ही, कॉम्प्युटरचे खेळ खेळल्यामुळे मुलांमध्ये एकलकेंडेपणा वाढीस लागला आहे. व आरोग्याची हानी होत असल्याची जाणीव करून दिली. तर मैदानी खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, सहनशिलता, संघभावना, कुशल नेतृत्व तसेच शिस्त, जिद्द, संयम या गोष्टीचा विकास साधता येतो, याचे महत्त्व पटवून दिले. हायस्कूलचे क्रीडाशिक्षक वाय. एफ. निलजकर व एस. के. पाटील यांनी सर्व खेळांचे नियम सांगून अगदी खिलाडूवृत्तीने या क्रीडास्पर्धा यशस्वी पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करून सर्वांचे मन वेधून घेतले. श्रीमती आर. टी. टक्केकर तर सहशिक्षक टी. आर. पत्री यांनी आभार मानले.