Tarun Bharat

मराठा स्पोर्ट्स, स्टार इलेव्हनची विजयी सलामी

साईराज चषक ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्टार इलेव्हन संघाने मिनार स्पोर्ट्स संघाचा 8 गड्यांनी, मराठा स्पोर्ट्स संघाने युनायटेड स्पोर्ट्स बालाजी संघाचा 9 गड्यांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. साजिद अन्सारी, नवीन हंचिनमनी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

व्हॅक्सिन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात मिनार स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 54 धावा केल्या. त्यात प्रशांतने 11 धावा केल्या. स्टार इलेव्हनतर्फे मेहब्बुने 3 तर आजिमने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्टार इलेव्हन संघाने 5.2 षटकात 2 गडी बाद 57 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात शाहिद अन्सारीने 43 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात युनायटेड स्पोर्ट्स बालाजी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 56 धावा केल्या. त्यात अजित सुंधकरने नाबाद 19 तर प्रभाकर पाटीलने 14 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्स क्लबतर्फे वसंत शहापूरकरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठो स्पोर्ट्स संघाने 4.4 षटकात 1 गडी बाद 60 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. तर नवीन एच. ने 40 धावा केल्या. सामन्यानंतर महेश फगरे व उत्तम शिंदे यांच्या हस्ते साजिद अन्सारी यांना तर दुसऱ्या सामन्यात सचिन चव्हाण, विश्वजित चौगुले, निकेश हंबले, अभिजित जवळकर यांच्या हस्ते नवीन हंचिनमनी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

प्रदर्शनीय सामन्यात राहूल फगरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 59 धावा केल्या. त्याला उत्तर देताना रोहित फगरे संघाने 5.2 षटकात 1 गडी बाद 63 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. दुसऱ्या प्रदर्शनीय सामन्यात पोस्टऑफिस संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 54 धावा केल्या. त्याला उत्तर देताना आधार सोसायटी मंडोळी संघाने 5 षटकात 4 गडी बाद 57 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात आधार सोसायटी मंडोळीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 44 धावा केल्या. त्याला उत्तर देताना रोहित फगरे संघाने 6 षटकात 3 गडी बाद 45 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. अभय उंडाळे, वैभव पाटील, कल्पेश संभोजी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Related Stories

केएलई विद्यापीठाला नॅक सदस्यांची भेट

Amit Kulkarni

सीमावासीय एका ज्येष्ट कार्यकर्त्यास मुकले!

Amit Kulkarni

महामार्गावर थांबणाऱया अवजड वाहनांमुळे अडथळा

Amit Kulkarni

तालुक्यात गणेश जयंती उत्साहात

Amit Kulkarni

मनपाच्या व्यापारी गाळे लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद

Patil_p

यंदा आंबा उत्पादनात घट

Omkar B