पेडणे : मराठी भाषा ही संस्कृतीचे संवर्धन करणारी भाषा आहे, असे प्रतिपादन शिक्षक दीक्षांत मावळणकर यांनी देवसू येथे केले. प्रज्ञा हायस्कूल देवसू कोरगाव येथे राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक राजू तळवणेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनी. पी. एस. व इतर शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मिनी पी. एस. यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन कऊन सुऊवात झाली. शाळेच्या गान वृंदाने ‘ही माय मराठी अमुची’ हे सुंदर गीत सादर केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर शिक्षिका यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे मराठी गौरव गीत सादर केले. या कार्यक्रमाला संगीत साथ शाळेचे संगीत शिक्षक गोरे, अऊण आरोंदेकर, सिद्धेश म्हामल यांनी केली. तन्वी कृष्णा गोडकर व वेदिका प्रमोद राऊळ या विद्यार्थिनीनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच सनिष संतोष आंबेकर व शेनोन रॉड्रिग्ज या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कविवर्य कुसुमाग्रज यांची ‘श्रावण आला’ या गीत बाह्य कवितेवर प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. तसेच मराठी साहित्याचे विविध प्रकार यावर भाष्य करणारे नाटक इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केले. शाळेच्या शिक्षिका सौ. दीपा पिंगुळकर यांनी कुसुमाग्रजांची कविता सादर केली. विद्यार्थिनी दिशा हनुमंत जोशी या विद्यार्थिनीने कुसुमाग्रजांची श्रावण आला ही कविता सादर केली तर मयूर विजय कशालकर याने गंगामाई ही कविता सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा अभिजित देसाई यांनी केले. आभार धिराज आनंद बांदेकर यांनी मानले.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.