Tarun Bharat

हिल मॅरेथॉनवर मराठी झेंडा

Advertisements

मराठमोळया धावपट्टूंनी इथोपियांची उणीव काढली भरुन, भारतीयांनी केले विक्रम प्रस्थापित

प्रतिनिधी/ सातारा

सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे यावर्षी नियोजन महिला पदाधिकाऱयांनी केले होते. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर ही स्पर्धा झाली. मॅरेथॉनचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात आले. यावेळी संयोजक म्हणून संयोजक डॉ. सुचित्रा काटे, डॉ. रंजिता गोळे, डॉ. आदिती घोरपडे, डॉ. पल्ल्वी पिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होत्या.

सकाळी पोलीस कवायत मैदानावर वाद्याच्या आवाजात धावपट्टूंना धावण्यासाठी प्रोत्साहित करत स्पर्धेला प्रारंभ झाला. धावपट्टूंनी शिवतीर्थ, शाहु चौक, समर्थ मंदिर, बोगदा असे चढाचे अंतर पार करत पुढे धावपट्टू यवतेश्वर घाटातून प्रकृती रिसॉर्टपर्यत पोहोचले. यवतेश्वरचा घाट संपूर्ण धावपट्टूंनी भरुन गेला होता.

मॅरेथॉनचे अंतर 1 तास 9 मिनिट या विक्रमी वेळेत पार करत औरंगाबादचा प्रल्हाद घनवटने पहिला क्रमांक पटकावला. तर महिलांमध्ये माण तालुक्यातील म्हसवड येथील रेश्मा केवटे हिने 1 तास 24 मिनिटात अंतर पार केले. त्याचबरोबर पुरुषांमध्ये द्वितीय येण्याचा मान वाई तालुक्यातील मांढरदेवचा कालिदास हिरवे याने 1 तास 12 मिनिट तर परशराम भोई यांनी 1 तास 16 मिनिटात तृतीय क्रमांक पटकावला. महिलांच्यामध्ये वृषाली उत्तेकर हिने 1 तास 39 मिनिटात द्वितीय क्रमांक तर मनिषा जोशी यांनी 1 तास 44 मिनिटात तृतीय क्रमांक पटकावला.

एशियन स्पर्धा पूर्ण करायची आहे

गतवेळी मी 1 तास 32 मिनिटात ही मॅरेथॉन पूर्ण केली होती. यावेळी ती 1 तास 24 मिनिटात पूर्ण केली आहे. 2020 ला मी धावले होते. मी इंडियन कॅटगरीत आले होते. यावर्षी रोड छान होता. नियोजनही छान केले होते. महिलांनी फिटनेस हा चांगला ठेवला पाहिजे. योगा आणि रन करेल एवढा छान आहे. माण तालुका दुष्काळी तालुका आहे. माणदेशी खेळाडू हे खडतर परिस्थितीतून आलेले खेळाडू मोठे होतात. माणदेशीचा मला सर्पोट आहे. सातारा हिल मॅरेथॉनसाठी तीन वेळा सणस मैदान येथे सराव करत होते. हैद्राबाद मॅरेथॉन 42 किलोमीटर पूर्ण केले. मला 42 किलोमीटरची ए†िशयन मॅरेथॉन पूर्ण करायची आहे.

रेश्मा केवटे, म्हसवड

फुल मॅरेथॉनची तयारी करतो आहे

मांढरदेव येथे पॅक्टीस करतो. राजगुरु कोचळे सर हे माझे मार्गदर्शक आहेत. सेंकड टाईम जेव्हा ही मॅरेथॉन सुरु झाली तेव्हा 2012 चा मी विनर होतो. आता दुसऱयांना पळालो. आता प्रॅक्टीस रन म्हणून पळालो. मला खूप छान वाटले. इतर मी शंभरहून अधिक मॅरेथॉन पळालो आहे. मी मुंबई मॅरेथॉनचा विनर आहे. मला शिवछत्रपती ऍवार्ड मिळाला आहे. मी इंटरनॅशनल खेळाडू आहे. फुल मॅरेथॉनची माझी तयारी सुरु आहे.

कालिदास हिरवे, मांढरदेव

रेकार्ड ब्रेक केल्याचा आनंद

सागरसरांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेला आलो. चांगली स्पर्धा ऑरगनाईज केली होती. सातारकरांचे धन्यवाद देतो. पायलट वैगरे खूप छान होते. माझी ही 56 वी मॅरेथॉन होती. माझी सातारा हाफ हिल मॅरेथॉन दुसरी मॅरेथॉन असून 2020 मध्ये 1 तास 12 मिनिटात अंतर पार केले होते. आता 1 तास 9 मिनिटात अंतर पार केले आहे.

प्रल्हाद घनवट, औरंगाबाद

Related Stories

एस बँक घोटाळय़ातील वाधवान बंधुची चौकशी

Omkar B

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आढावा

Patil_p

सातारा जिल्हयाला आणखी एक मोठा झटका; ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

आजपासून दोन दिवस बँक कर्मचारी संपावर!

Rohan_P

एफआरपी न दिल्यास गाळप परवाना देवू नका

Patil_p

भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी सिध्द करण्याची तयारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!