उपराष्ट्रपदासाठी यूपीएकडून (UPA) मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर एनडीएकडून (NDA) जगदीप धनकड (Jagdeep Dhankhar) यांचे नाव काल जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अल्वा विरुध्द धनकड अशी लढत पाहायला मिळणार आहे. काल धनकड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली होती. आज बैठकीनंतर अल्वा यांचे नावं समोर आलं आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी १७ पक्षांची उपस्थिती होती. एकमताने त्यांच नाव जाहिर करण्यात आले. दरम्यान शिवसेनेनं यूपीएला पाठिंबा दिला आहे. अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत य़ांनी दिली.
कोण आहेत मार्गारेट अल्वा
मार्गारेट अल्वा या दाक्षिणात्य असून मूळच्या कर्नाटकातील मंगळूरच्या आहेत. तसेच त्या ख्रिश्चन आहेत.
मार्गारेट अल्वा या पूर्वाश्रमीच्या काॅंग्रेस नेत्य़ा होत्या. पण गेल्या काही वर्षापासून आता त्यांचा काॅंग्रेसशी काहीही संबंध नाही. त्यांना काॅग्रेसने निलंबित केलं होते. तसेच त्या राजस्थानच्या राज्यपालही राहिलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावावर एकमत झालं आहे. मार्गारेट अल्वा उत्तराखंड, राजस्थान, गुजरात आणि गोव्याच्या राज्यपाल राहिल्या आहेत.
हेही वाचा- संजय मंडलिकांनी शिंदे गटासोबत जावं; कार्यकर्त्यांची मागणी
या निवडणूकीत एनडीएचा विजय खूप सुकर आहे. राष्ट्रपती निवडणूकीवेळी जी फूट विरोधकांमध्ये पडली तशीच फूट उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आज झालेल्या बैठकिला आम आदमी पक्ष आणि तृणमूल या दोन पक्षांची उपस्थिती नव्हती. त्य़ामुळे य़ा दोन पक्षांची भूमिका काय़ असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच राष्ट्रपती निवडणूकीत शिवसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या निवडणूकीत नेमकं काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.


previous post