Tarun Bharat

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर उत्पादनात किरकोळ वाढ

देशातील आकडेवारीची इस्माकडून माहिती सादर

नवी दिल्ली

देशातील साखरेच्या उत्पादनात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये किंचित वाढ होऊन 47.9 लाख टनवर पोहचले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) ही माहिती दिली.

साखरेचे व्यापारी वर्ष

चालू व्यापारी वर्ष 2022-23 मध्ये, 30 नोव्हेंबरपर्यंत साखरेचे उत्पादन गेल्या वर्षी याच कालावधीतील 47.2 लाख टनांच्या तुलनेत वाढून 47.9 लाख टन झाले आहे, असे इस्माने एका निवेदनात म्हटले आहे.

अन्य बाबी….

–
इस्माच्या आकडेवारीनुसार, 2022-23 च्या हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 20 लाख टन झाले, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 20.3 लाख टन होते.

–
उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन पूर्वीच्या 10.4 लाख टनांवरून वाढून 11.2 लाख टन झाले.

–
कर्नाटकातील साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या 12.8 लाख टनांवरून यंदा 12.1 लाख टनांवर घसरले आहे.

–
इथेनॉल आघाडीवर, पेट्रोलियम कंपन्यांनी आत्तापर्यंत इथेनॉल पुरवठा वर्ष 2022-23 मध्ये पुरवठय़ासाठी सुमारे 460 कोटी लिटरचे वाटप केले आहे.

–
ओएमसीने अतिरिक्त 139 कोटी लिटरच्या गरजेसाठी तिसरा इओआय जारी केला आहे, ज्याची जमा करण्याची करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 होती.

Related Stories

चालू वर्षी व्यावसायिक वाहन उद्योग चांगली कामगिरी करेल

Patil_p

जेएमसी प्रोजेक्ट्सला मिळाली 1,524 कोटीची ऑर्डर

Amit Kulkarni

इमामी ऍग्रोटेकचे खाद्यतेल ब्रँडमधून 5,000 कोटीच्या उलाढालीचे ध्येय

Patil_p

जानेवारी-जूनमध्ये जीवन विमा कंपन्याचा प्रिमियम घटला

Omkar B

तेलाच्या ऐतिहासिक घसरणीने बाजार कोसळला

Patil_p

वाहन नोंदणीत ऑगस्टमध्ये 15 टक्क्यांची वाढ

Amit Kulkarni