Tarun Bharat

कारागृहात स्पीड पोस्टमधून गांजा

कारागृहातील सतर्कतेमुळे घटना उघडकीस

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

कळंबा कारागृहामध्ये चक्क स्पिडपोस्टमधून गांजा पाठविल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी श्रीकांत दिलीप भोसले (रा. फुलेवाडी 4 था स्टॉप, कोल्हापूर) याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे कारागृह प्रशासन सतर्क झाले आहे. याबाबतची फिर्याद तुरुंगाधीकारी श्रेणी क्रमांक 2 निशा दिलीपकुमार श्रेयकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबा कारागृहात कैद्यांसाठी बॉलमधून गांजा, मोबाईल, सीमकार्ड आदी साहित्य संरक्षण भींतीवरुन टाकण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र सोमवारी कारागृहात गांजा पुरविण्याचा नवा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कारागृहातील कैदी मित्रासाठी स्पीड पोस्टच्या पाकीटातून चक्क गांजा पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला. कारागृहामध्ये बंदीजनांना रजिस्टर ईडी व स्पीड पोस्टाद्वारे आलेली पत्रे तपासून दिली जातात. सोमवारी सकाळी शिक्षाधिन कैदी महेश सुरेश पाटील याच्याकडे हे तपासण्याचे काम दिले आहे. तो मेनगेटमधून सर्कलमधील कैद्यांना आलेली पत्रे तपासत होता. त्यावेळी कारागृहात सुरज दिलीप भोसले सर्कल नं. 5/2 मध्ये या नावाचा कैदी नसताना त्याच्या नावे श्रीकांत भोसले याने स्पीड पोष्टाने पाकिटातून तीन ग्रॅम गांजा सदृश्य पाला कारागृहात पाठवल्याचे दिसून आले.त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याची तक्रार तुरुंगाधिकारी निशा श्रेयकर यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. त्यानुसार भोसले याच्यावर गुन्हा नोंद झाला

Related Stories

उजळाईवाडी सरपंच पद एका मताने वाचले

Sumit Tambekar

कोल्हापूर : दिवसभरात 275 स्वयंसेवकांना लस

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे १८२४ नवे रुग्ण, ३३ बळी

Abhijeet Shinde

पालकमंत्री नसल्याने जिह्यातील मंजूर कामे थांबली

Kalyani Amanagi

कोल्हापूर : कानूर बुद्रुक येथे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेबाबत शासनाने गांभीर्य घेतले पाहिजे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!