धारबांदोडा : गावठण, पिळ्यो-धारबांदोडा विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बाजार डे उत्साहात साजरा करण्यात आला. अॅड तनुजा शेटकर यांच्याहस्ते बाजार डे चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका सुरेखा नाईक, उपाध्यक्ष रमेश शेठ्यो, खजिनदार ज्योती शिंदें, कुमार महाजन आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सुरेखा नाईक यांनी स्वागतपर भाषणात बाजार डे भरविण्याबाबत उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहूण्या तनुजा शेटकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमातून लहान वयात मुलांना व्यवहार ज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होत असते. आत्मविश्वास वाढून स्वावलंबनाची भावना निर्माण होत असल्याचे विचार मांडले. यावेळी रमेश शेट्यो, कुमार महाजन, ज्योती शिंदे, गीता बसेटकर, स्नेहा बंडीवदर, विश्रांती गौडा, लक्ष्मी पुजारी, रझिया मुल्ला या पालकांनी आपले अनुभव कथन केले. उपक्रम इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी होता मात्र सर्व पालकांनी उत्तम सहकार्य करीत बाजार डे यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. शाळेच्या बाजारात कांदे, बटाटे, भाज्या, फळे, शेव चिवडा, चकली, लाडू व इतर अनेकविध पदार्थ स्वत: पालकांनी तयार करून विक्रीसाठी केले होते. गावच्या नागरिकांनी, पालकांनी व शिक्षकांनी उत्साहाने खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिल्यामुळे अवघा दीड तासात सर्व वस्तूंची विक्री झाली. शिक्षिका वंदना जाधव यांनी आभार मानले.
Previous Articleकवळे सरस्वती विद्यालयाचे बक्षिस वितरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.