Tarun Bharat

चढउताराच्या प्रवासात बाजार प्रभावीत

Advertisements

सेन्सेक्स 38 तर निफ्टी 8 अंकांनी पडझडीत

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारातील आठवडय़ातील दुसऱया दिवशीच्या सत्रात मंगळवारी मोठय़ा प्रमाणात चढउताराचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक काहेशा घसरणीनंतर बंद झाले आहेत. यामध्ये धातू, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील समभागांच्या नुकसानीच्या प्रभावात सेन्सेक्स 38 अंकांनी घसरला आहे.

जागतिक पातळीवरील कामगिरीमध्ये विदेशी संस्थांकडून बाजारातील रक्कम काढल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यासोबतच दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 37.70 अंकांनी घसरुन निर्देशांक 57,107.52 अंकांवर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8.90 अंकांनी काहीसा घसरुन निर्देशांक 17,007.40 वर बंद झाला आहे.

मंगळवारी सेन्सेक्समधील टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 2.25 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच टायटन, भारतीय स्टेट बँक, कोटक बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक तसेच एचडीएफसी नुकसानीत राहिले आहेत. दुसरीकडे पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, डॉ.रेड्डीज लॅब, एचसीएल टेक आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 18 नुकसानीत राहिले होते. यावेळी आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे लाभात होते. याच दरम्यान युरोपीयन बाजारात सुरुवातीला मिळताजुळता कल राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल  1.78 टक्क्यांनी वधारुन 85.56 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचे काय निर्णय राहणार, जागतिक पातळीवरील आर्थिक राजकारण यासह अन्य घडामोडींवर भारतीय बाजाराची दिशा निश्चित होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे..

Related Stories

कोरोनाचा विळखा : ओयोकडून कर्मचारी कपातीचे संकेत

tarunbharat

ऑटो एक्स्पो पुढील वर्षी जानेवारीत

Patil_p

आर्सेलर-मित्तलचा ओडीसात कारखाना

Patil_p

रियलमी 7 5जी स्मार्टफोन लाँच

Omkar B

सुरुवातीच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया तेजीत

Amit Kulkarni

फसलेल्या पाककृती

Patil_p
error: Content is protected !!