Tarun Bharat

नागपंचमीच्या सणासाठी बाजारपेठ बहरली

प्रतिनिधी / बेळगाव : नागपंचमी अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपल्याने नागपंचमीच्या सणासाठी लागणार्‍या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात शनिवारी गर्दी झाली होती. नागपंचमी, श्रावण मास या पार्श्वभूमीवर बाजारपेठ देखील बहरली होती. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल दिसून आली. विशेषत: फराळासाठी गर्दी झाली होती. चिवडय़ाचे पोहे, रवा, शेंगदाणे, गूळ, खोबरे, फुटाणे, लाहय़ा आदींची खरेदी जोमाने सुरु झाली आहे.

श्रावणातील पहिलाच सण नागपंचमीचा येत असल्याने विशेषत: महिलावर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गत दोन वर्षात कोरोनामुळे निर्बंध आले होते. मात्र यंदा सण उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे नागपंचमीच्या खरेदीसाठी बाजारात उधाण आल्याचे दिसत आहे.

Related Stories

महावीर को-ऑप.बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात

Omkar B

बेळगाव परिसरातून दिंडय़ा होणार मार्गस्थ

Amit Kulkarni

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज बेळगावात

Amit Kulkarni

युक्रेन येथून 9 विद्यार्थी सुखरूप परतले

Amit Kulkarni

शांततेला सुरुंग लावण्यासाठी कनसेच्या गुंडांचा पुन्हा गोंधळ

Patil_p

चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Amit Kulkarni