वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया अर्सेनेल फुटबॉल क्लबमध्ये ब्राझीलचा 19 वर्षीय फुटबॉलपटू मारक्विनोस दाखल झाला आहे. यापूर्वी मारक्विनोस साओ पावलो क्लबकडून खेळत होता.
अर्सेनेल फुटबॉल क्लबने मारक्विनोसशी दीर्घ मुदतीचा करार केला आहे. मारक्विनोसने यापूर्वी 16 आणि 17 वर्षांखालील वयोगटात ब्राझीलचे प्रतिनिधीत्व केले होते. मारक्विनोस लवकरच ब्राझीलमधून लंडनमध्ये दाखल होईल.