Tarun Bharat

रात्री विवाह, सकाळी वैधव्य

रात्री विवाह, सकाळी वैधव्य

ही कोणत्या महिलेच्यासंबंधी घडलेली दुर्दैवी घटना नाही. तर उत्तर भारतातील किन्नर समाजात शेकडो वर्षांपासून असलेली एक परंपरा आहे. किन्नर किंवा तृतीय पंथीय यांचे अनेक पंथ आहेत. त्यापैकी काही पंथांमध्ये किन्नरांचा मध्यरात्री विवाह केला जातो. हा विवाह कोणत्या जिवंत व्यक्तीशी होत नाही तर भगवान अरावण या देवतेशी केला जातो. विवाह झाल्यानंतर त्याच दिवशी पहाटे किन्नरांच्या कपाळावरील कुंकू पुसले जाते आणि चुडी तोडली जाते. हा विवाह एक औपचारिक सोहळा असून ही परंपरा बरीच जुनी असल्याचे सांगितले जाते.

पंजाब आणि हरियानामध्ये किन्नरांची मंदिरे आहेत. त्यांच्या जीवनशैलीवर संशोधन करण्यासाठी तसेच त्यांच्या परंपरा समजून घेण्यासाठी अनेक मान्यवर या मंदिरांमध्ये वास्तव्य करतात. अशाच काही मान्यवरांनी किन्नरांच्या अनेक आश्चर्यकारक परंपरा शोधून काढल्या आहेत. त्यापैकीच ही एक आहे.

हा विवाह मंदिरामध्येच लावला जातो. नेहमीच्या विवाहाप्रमाणेच त्याची तयारी केली जाते. किन्नरांचे गुरू हा विवाह लावतात. काही मंदिरांमध्ये ज्ये÷ किन्नर महिला गुरुची भूमिका निभावतात. किन्नरांसाठी हे गुरुच सर्व काही असतात. त्यांच्या इच्छेनेच किन्नरांचा दिनक्रमही ठरत असतो. विवाह झाल्यानंतर पत्नीच्या गळय़ात मंगळसूत्र आणि हातात चुडी घातली जाते. पहाटे मंगळसूत्र काढून घेऊन चुडय़ा फोडल्या जातात. विवाहापूर्वी 17 दिवस किन्नर शृंगार करून विवाहाची सज्जता करतात. त्यांना आहेर दिला जातो. केळवण केले जाते. विवाहाच्या सर्व प्रथा पाळल्या जातात. पण हा विवाह केवळ औपचारिकच असतो. पहाटे किन्नर ‘विधवा’ झाल्यानंतर पांढरी साडी नेसतात. भारतीय परंपरेनुसार विवाह हा सात जन्मांसाठी असतो. तथापि, किन्नरांसाठी तो एका रात्रीपुरता असतो. तो का केला जातो, याचे उत्तर असे आहे, की किन्नरांचे नेहमीप्रमाणे विवाह होणे शक्मय नसते. त्यामुळे त्यांना विवाहाचे समाधान मिळावे, एवढय़ासाठीच अशाप्रकारे तो केला जातो.

Related Stories

राज्यात पुन्हा 12 नवे रुग्ण

Patil_p

उत्तराखंडात 580 नवे कोरोना रुग्ण; 15 मृत्यू

Tousif Mujawar

गलीबॉय, सुपर30 चित्रपटांना मिळणार पुरस्कार 26 चित्रपटांचा होणार गौरव

Omkar B

जम्मू काश्मीरमध्ये 487 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 5 मृत्यू

Tousif Mujawar

गायीला साक्ष मानून विवाह

Patil_p

लाहोल-स्फितीत पहिली हिम मॅरेथॉन

Amit Kulkarni