विवाहासाठीचा करार होतोय व्हायरल
विवाह हा सप्तपदींमुळे तयार झालेले जन्मांचे बंधन आहे. या बंधनात काही अटी देखील असतात, परंतु ती केवळ केवळ वधूवरामधील बाब असते. पण सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याच्या विवाहाचा करार प्रचंड चर्चेत आहे. या करारात वधूने ठेवलेल अटी पाहून आता अनेक मुली त्याचे अनुकरण करू पाहत आहेत. यातील काही अटी तर एवढय़ा विचित्र आहेत की वराला आपण विवाह करावा की नको असे वाटावे.
वधूवर एका करारपत्रावर स्वाक्षरी करत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसून येते. या करारपत्रात इंग्रजीत 8 अटी लिहिलेल्या आहेत. पहिली अट दोघेही महिन्यात केवळ एकच पिझ्झा खाणार अशी आहे. दुसऱया अटीनुसार नवऱयाला नेहमीच घरातील जेवणासाठी हो म्हणावे लागेल. तिसरी अट वधूसाठी आहे, ज्यानुसार तिला विवाहानंतर घरात नेहमी साडी परिधान करावी लागेल. नवरा मुलगा नाइट पार्टी करू शकतो, परंतु केवळ स्वतःच्या पत्नीसोबत अशी चौथी अट आहे.
पाचव्या अटीनुसार दोघांनाही दररोज जिमला जावे लागेल. नवऱयाला दर रविवारी नाश्ता तयार करावा लागेल अशी सहावी अट ठेवण्यात आली आहे. सातव्या अटीनुसार पतीला प्रत्येक पार्टीत पत्नीची सुंदर छायाचित्रे काढावी लागतील. आठव्या अटीत दर 15 दिवसांनी पतीने पत्नीला शॉपिंगसाठी न्यावे असे म्हटले गेले आहे.
विवाह आहे का करार
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये ‘विवाहाचा करार’ असे नमूद आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 40.6 दशलक्ष ह्यूज आणि 1.9 दशलक्ष लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. तसेच शेकडो युजर्स कॉमेंट करत आहेत. काही युजर्सना हा करार आवडला आहे. तर मुलींना 8 वी अट अधिकच पसंत पडली आहे.