Tarun Bharat

जोडीदार शोधताय?… ‘या’ टीप्स करा फॉलो

Advertisements

लग्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे, लग्न म्हणजे फक्त दोघांचे मिलन नसून ज्याचा आनंद स्त्री-पुरुषासह त्यांच्या कुटुंबाला देखील होतो. आजकाल लग्नाची व्याख्या बदलत आहे. जोडीदारा बद्दलच्या अपेक्षा बदलत आहेत. फक्त नवरा बायको ही संकल्पना न राहता मित्र मैत्रीणी सारखे नाते असावे अशी अपेक्षा रुजू होत आहे. बहुतेक लोक लग्नाबद्दल संभ्रमात असतात की, त्यांचा जोडीदार कसा असेल, त्याच्या सवयी काय असतील, कुटुंबातील सदस्यांची निवड कशी असेल आणि त्याच वेळी अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या कोणाचंही मन दुविधेत टाकू शकतात. जोडीदाराकडून प्रेम हवे असते पण बंधन नको. स्वातंत्र्य हव, नियम नको असच काहीसं.
लग्नाआधी करिअरला महत्व दिलं जातं आहे. लग्नापेक्षा काहीजण “लिव्ह इन” हा पर्याय निवडतात. कारणं लग्न म्हणजे अनेकांना एकप्रकारची बेडी वाटते. लग्नाचा निर्णय घेणे हे स्वतः एक कठीण काम आहे, परंतु जे लोक लग्न हेचं पवित्र मानतात आणि त्यासाठी जोडीदाराचा शोध घेत आहेत, त्यांच्यासाठी अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे त्यांची ही कोंडी काहीशी कमी होऊ शकेल. चला तर, मग लग्नाविषयी महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया…

लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर रहा.
लग्नाचा विचार करताना असा एखादा व्यक्ती निवडा की, जो तुमच्याही विचारांना प्राधान्य देईल.
नेहमी तुमचा विचार चुकीचा आणि आपलाच विचार किती योग्य पटवून देणाऱ्या व्यक्तीपासून नेहमीच दूर रहा.
वर्चस्व गाजवायला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न करू नका.
आपल्या देखील कुटुंबाचा विचार करणारी व्यक्ती कधीही निवडा
दोघांचेही विचार समान आणि मिळते-जुळते असावेत. प्रत्येक वेळेस ते जुळतील असेही नाही पण किमान आपण चिडलो तर समोरची व्यक्ती शांत ऐकून घेईल किंवा तो चिडला तर आपल्यालाही शांत राहून ऐकून घेता आले पाहिजे.
एकमेकांप्रती आदर असावा.
तुमच्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती निवडा.
तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची निवड करा.
आपली काळजी घेणारी आणि वैयक्तिक स्पेस देणाऱ्याला प्राधान्य द्या.

सुखी विवाहित जीवनासाठी टिप्स :
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहायला शिका.
दुसऱ्यांच्या जोडीदारासोबत आपल्या जोडीदाराची तुलना करू नका
एकमेकांच्या मताचा आदर करा.
आपल्या जोडीदारासह घरातील कामे शेअर करा.
समोरचा चिडला तर लगेच रिॲक्ट होण्याची काही गरज नाही. त्याच मत आधी शांतपणे ऐकून घ्या. ती वेळ मारून नेता आली पाहिजे
नेहमी एकमेकांचे कौतुक करा. अपेक्षा कमी करा.
विवाहात विश्वास आणि निष्ठा टिकवून ठेवा.
एकमेकांसोबत वेळ घालवा.
नात्यात तोच तोच पणा येत असेल तर नात्याला चार्ज करण्यासाठी काहीतरी नवीन मार्ग काढले पाहिजे. जस की फिरायला जाणे, एखाद गिफ्ट देणं अशाप्रकारे.
अधूनमधून आपला जोडीदार आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे पटवून द्या.प्रेम व्यक्त करा.
I love you , i want u असे काही प्रेमाला पालवी फुटणारे वाक्य म्हणायला विसरू नका

Related Stories

VatPornima Special 2022 : जाणून घ्या, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Abhijeet Khandekar

सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय

Kalyani Amanagi

केसांची ग्रोथ होत नाही, केस तुटताहेत? हे घरगुती उपाय करा

Archana Banage

घरच्या घरी करा Skin Care Routine; जाणून घ्या ट्रिक्स

Archana Banage

जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घ्या ;सायकलचा इतिहास

Rohan_P

सण-समारंभा साठी प्रोफेशनल मेकअप कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!