अमेरिकेतील शिकागो येथे कंपनीचे मुख्यालय : डॉर्क चॉकलेटचा औपचारिक प्रवेश
नवी दिल्ली :
अमेरिकेतील शिकागो येथे मुख्यालय असलेल्या मार्स रिग्ले या कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतात आपल्या प्रमुख उत्पादन गॅलेक्सी अॅण्ड फ्यूसिन्सने उत्पादन सुरू केले आहे. मार्स या ब्रँड अंतर्गत डार्क चॉकलेटची निर्मिती करण्यात येते. यासह कंपनीने भारतातील डार्क चॉकलेट मार्केटमध्ये औपचारिकपणे प्रवेश केलेला आहे. या बाजारात सध्या अमूल, कॅडबरी यांसारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे.
काय आहे डार्क चॉकलेट :
डार्क चॉकलेटमध्ये 70टक्के पेक्षा जास्त कोको असतो. त्यामध्ये साखर आणि दूध खूप कमी प्रमाणात असते. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीकोनातून ते फायदेशीर मानले जाते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून त्याची भारतातील बाजारपेठ दुहेरी अंकांमध्ये वाढत असल्याची माहिती आहे. भारतातील बाजारपेठेचा आकार 1.8 अब्ज डॉलर उलाढालीचा आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या, चॉकलेटमध्ये थियोब्रोमाइन आणि फेनिलेथिलामाइन असते. ते मनाला चालना देते. हे दोन्ही पदार्थ डोपामाइन तयार करण्यासाठी मेंदूला उत्तेजित करतात. हे एक संप्रेरक आहे जे आराम आणि आनंद निर्माण करते.
या ठिकाणी उत्पादन होणार आहे.
चॉकलेटचे अनेक प्रकार :
प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाचे फायदेही वेगळे. यापैकी डार्क चॉकलेट हे सर्वात आरोग्यदायी मानले जाते. डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, जस्त, मॅंगनीज भरलेले असते. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते.