Tarun Bharat

सियाचीनमध्ये 38 वर्षांनी मिळाले हुतात्म्याचे पार्थिव

1984 च्या ऑपरेशन मेघदूतमध्ये 19 जवानांना हौतात्म्य

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनामुळे बर्फाखाली गाडले जात हुतात्मा झालेले लान्सनायक चंद्रशेखर हर्बोला यांचे पार्थिव 38 वर्षांनी मिळाले आहे. पार्थिव  मिळाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. प्रशासनानुसार हुतात्म्याचे पार्थिव मंगळवारी हल्दानी येथे त्यांच्या गावी पोहोचण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्हय़ातील हाथीखूर गावचे रहिवासी असलेले हर्बोला हे 1971 मध्ये कुमाऊं रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. मे 1984 मध्ये बटालियन कमांडर लिडर लेफ्टनंट पी. एस. पुंडीर यांच्या नेतृत्त्वाखाली 19 जवानांची तुकडी ऑपरेशन मेघदूतसाठी रवाना झाली होती. 

29 मे 1984 रोजी मोठय़ा हिमस्खलनात ही पूर्ण बटालियन बर्फाच्या ढिगाऱयाखाली गाडली गेली होती. त्यानंतर त्यांना हुतात्मा घोषित करण्यात आले होते. त्यावेळी चंद्रशेखर यांचे वय 28 वर्षे होते.

Related Stories

भगवान श्रीरामाला आता ‘लाल सलाम’

Patil_p

कुटुंबातील 15 जण शरयू नदीत बुडाले

Patil_p

गुगलमधील चुका शोधून मिळविले 65 कोटी

Patil_p

झारखंडमधील 3 आमदारांवर काँग्रेसची कारवाई

Patil_p

विदेशी अर्थसाहाय्य – संस्थांना दिलासा नाहीच

Patil_p

अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांना दिलासा

Patil_p