महिला आघाडीचा निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमालढ्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीही हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण महिला आघाडीच्या बैठकीत करण्यात आला.
शनिवार खूट येथील महिला आघाडीच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर होत्या. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, प्रिया कुडची, कांचन भातकांडे, भाग्यश्री जाधव, राजश्री बाबुळकर, माला जाधव, अर्चना कावळे, आशा सुपली, प्रभावती सांबरेकर, शामिनी पाटील यांसह इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.