बीईओ रवी बजंत्री यांच्याकडून पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मारुती गल्ली येथील शाळा क्रमांक 1 च्या इमारतीमधील एक खोली कोसळली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती बीईओंना मिळताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून विद्यार्थ्यांना गणपत गल्ली येथील शाळेमध्ये हलविण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मारुती गल्ली येथील कांबळीखूट येथे असलेली शाळा क्रमांक 1 ची इमारत जीर्ण झाली होती. गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे या शाळेच्या एका खोलीचे छत पूर्णपणे कोसळले. यावेळी त्या ठिकाणी विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बीईओ रवी बजंत्री यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांना गणपत गल्लीतील मराठी शाळेमध्ये हलविण्यात आले आहे.