स्मार्ट हायब्रिड एसयूव्ही होते स्वतःच चार्ज
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मारुती सुझुकीची नवीन कार सुझुकी ग्रँड विटारा भारतीय बाजारात बुधवारी सादर करण्यात आली आहे. ही एक इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड कार आहे.
एसयूव्ही एक लिटरमध्ये जवळपास 27.97 किलोमीटर इतके मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटाराचे प्री बुकिंग 11 जुलैपासून सुरु होणार आहे. साधारण 11,000 रुपयामध्ये बुकिंग करता येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये ऑल व्हिल ड्राईव्ह सिस्टम मिळणार आहे. तसेच कंपनीने यावर नेक्साव्हर्जही लाँच केली आहे.
कारची बॅटरी होते आपोआप चार्ज
नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारा 2022 मध्ये लिथियम आर्यन बॅटरी आहे. यामध्ये मोटारही असून पेट्रोल इंजिनही आहे. यात बॅटरी स्वतःचार्ज होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अन्य ठळक नोंदी
- सदरच्या कारची किंमत 9.5 लाख रुपये
- सनरुफ फिचर असणारी दुसरी एसयूव्ही
- वेंटिलेटेड सीट, मल्टीपल ड्रायव्हिंग मोड
- सेफ्टीसाठी 6 एअरबॅग
- 17 इंच एलॉय व्हील, नेक्स्टटीरे 3डी टेल लॅम्प
- बाजारात हय़ुंडाई क्रेटासारख्या कारसोबत राहणार टक्कर