Tarun Bharat

‘मारुती’ने 9,125 कार परत मागविल्या

02 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादन झालेल्या कार्सचा समावेश

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने मंगळवारी 2 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादित झालेली एकूण 9,125 वाहने परत मागवली आहेत. या मॉडेल्समध्ये सियाझ, बेझा, इर्टिगा, एक्सएल6 आणि ग्रँड विटारा आदींचा समावेश आहे.

कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. संबंधीत समस्या असणाऱया वाहन मालकांशी कंपनीच्या अधिकृत कार्यशाळेद्वारे संपर्क साधला जाईल. सदोष भाग बदलणे विनामूल्य असेल. यापूर्वी मारुती सुझुकीने आपल्या तीन मॉडेल्स वॅगन आर, सेलेरियो आणि इ ग्नसच्या 9,925 युनिट्स परत मागवल्या होत्या. मागील ब्रेक असेंबली पिनमधील दोषामुळे ही मॉडेल्स परत मागवली होती.

सीट बेल्ट शोल्डरमध्ये समस्या

कंपनीला या मॉडेल्समध्ये समोरच्या रांगेतील सीट बेल्ट शोल्डर हाईट ऍडजस्टर असेंब्लीच्या पार्टपैकी एकामध्ये दोष असल्याचा संशय आहे. यामुळे क्वचितप्रसंगी सीट बेल्ट उघडू शकतो. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि अत्यंत काळजी घेत, कंपनीने दोषयुक्त वाहनांची तपासणी आणि बदलीसाठी मागवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

गेल्या वर्षी 1,81,754 गाडय़ा परत मागविल्या

गेल्या वर्षी देखील मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत विकल्या गेलेल्या 1,81,754 कार परत मागवल्या होत्या. या गाडय़ांचे उत्पादन 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 दरम्यान करण्यात आले होते.

वाहने परत मागवण्याची मोठी प्रकरणे

1. बलेनो आणि वॅगनआर ः जुलै 2020 मध्ये, मारुतीने वॅगनआर आणि बलेनोच्या 1,34,885 युनिट्स परत मागवल्या. हे मॉडेल 15 नोव्हेंबर 2018 ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान तयार केले होते. सदोष इंधन पंपामुळे कंपनीने वाहने परत मागवली होती.

2. मारुती इको ः नोव्हेंबर 2020 मध्ये, कंपनीने इकोच्या 40,453 युनिट्स परत मागवल्या. कारच्या हेडलॅम्पवर मानक चिन्ह नसल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला. 4 नोव्हें. 2019 ते 25 फेब्रु. 2020 दरम्यान उत्पादित केलेल्या वाहनांचा यात समावेश होता.

3. महिंद्रा पिकअप रिकॉलः 2021 मध्ये, महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या व्यावसायिक पिकअप वाहनांची 29,878 युनिट्स परत मागवली. जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान उत्पादित काही पिकअप वाहनांमधील फ्लुइड पाईप बदलण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले होते.

4. महिंद्रा थार ः महिंद्रा अँड महिंद्राने फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या ऑफ-रोड एसयूव्ही थारच्या डिझेल व्हेरियंटची 1577 युनिट्स परत मागवली. कंपनीने म्हटले होते की प्लांटच्या मशिनरीमध्ये बिघाड झाल्यामुळे, भाग खराब झाले. सर्व युनिटचे उत्पादन 7 सप्टेंबर ते 25 डिसेंबर 2020 दरम्यान करण्यात आले.

 5. रॉयल एनफील्ड ः मे 2021 मध्ये रॉयल एनफिल्डने बुलेट 350, क्लासिक 350 आणि मेटियर 350 ची 2,36,966 युनिट्स शॉर्ट सर्किटमुळे परत मागवली. ही वाहने डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान तयार करण्यात आली होती.

Related Stories

प्रारंभीची तेजी गमावत शेअर बाजार घसरणीसह बंद

Patil_p

असुसचे नवे 6 लॅपटॉप बाजारात दाखल

Patil_p

तेजी परतली, सेन्सेक्स 702 अंकांवर मजबूत

Amit Kulkarni

थायरोकेअर समभागाचा 26 टक्के परतावा

Amit Kulkarni

मस्क यांनी ‘टेस्ला’चे 79 लाख समभाग विकले

Patil_p

शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये घसरण कायम

Amit Kulkarni