Tarun Bharat

मारुतीने डिझायर टूर कार्स परत मागविल्या

Advertisements

ग्राहकांना रिप्लेसमेंटच्या अगोदर ड्राईव्ह न करण्याचा सल्ला

नवी दिल्ली

 मारुती सुझुकीला त्यांचे मॉडेल डिझायर टूर एस (Dzire Tour ए) या कारमध्ये काही तांत्रिक (टेक्निकल) समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे 6 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान निर्मिती करण्यात आलेल्या कार परत मागविण्यात आल्याची माहिती कंपनीने बुधवारी दिली आहे. सदरच्या उत्पादनांमध्ये साधारणपणे जवळपास एकूण 166 डिझायर टूर कार्सचा समावेश आहे.

कंपनीने आपल्या कारमध्ये एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये समस्या निर्माण झाल्याचे म्हटले असून त्यासंदर्भात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दुरुस्तीकरीता या कार्स परत मागविल्या असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांना सूचना

यासोबतच कंपनीने यावेळी ग्राहकांना एक सूचना दिली आहे, की काही एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये टेक्निकल समस्या असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी कंपनीने विनंती केली आहे. यामुळे जोपर्यंत यामध्ये दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत कोणीही ड्राईव्ह (चालवू) करु नये अशा सूचना यावेळी मारुतीने दिल्या आहेत.

आपली कार यामध्ये आहे का?

सदरच्या कार परत मागविण्यात येणार असून यामध्ये आपल्या कारचा समावेश आहे का हे पाहण्यासाठी कंपनीच्या वेबसाईट

www.marutisuzuki.com   वर भेट देत याची माहिती घ्यावी.

Related Stories

वोल्वो कारची किरकोळ विक्री 2021 मध्ये 27 टक्के वाढली

Patil_p

ओकीनावा सर्वाधिक दुचाकी बनविणारी कंपनी

Amit Kulkarni

कीया मोटर्सची नवी सेल्टॉस दाखल

Patil_p

‘बूम’कडून दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर

Patil_p

महिंद्रा एक्सयूव्ही 700ला मिळाले फाईव्ह स्टार रेटिंग

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यूची ‘220 आय ब्लॅक आय शॅडोव’ कार लाँच

Amit Kulkarni
error: Content is protected !!