किंमत 8.28 लाख रुपयांपासून सुरु ः कंपनीची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकीने बलेनो प्रीमियम हॅचबॅक बलेनो आणि 6 सीटर प्रीमियम एमपीव्ही एक्सएल6 यांचे सीएनजीमधील मॉडेल सादर केले आहे. या दोन्ही नेक्सा श्रेणीतील पहिल्या कार आहेत ज्या सीएनजी प्रकारासह सादर करण्यात आल्या असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
एक्सएल6 सीएनजी हे मॉडेल सादर करण्यात आले असून यांची अंदाजे किंमत 12.24 लाख रुपये आहे. तर एक्सएल6 सीएनजी झेटा मॉडेलही सादर करण्यात आले असून याची किंमत 12.24 लाख रुपये राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
बलेनो सीएनजीची किंमत 8.28 लाख
मारुती सुझुकी बलेनो सीएनजी डेल्टा कार 8.28 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. त्याचवेळी, त्यांच्या झेटा मॉडेलची किंमत 9.21 लाख रुपये आहे. हे तिन्ही प्रकार त्यांच्या पेट्रोल मॉडेलपेक्षा 95 हजार रुपयांनी महाग आहेत.
30.61 किमीचे मायलेज
सदरच्या गाडीचे मायलेज पाहिल्यास यामध्ये मारुती बलेनो सीएनजीला 30.61 किमी/किलो मायलेज मिळेल. दुसरीकडे, मारुती एक्सएल6 सीएनजी ही कार 26.32 किमी/किलो पर्यंत मायलेज देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.