वृत्तसंस्था /मुंबई
मारुती सुझुकीची गाडी इको आता नवीन आणि अधिक शक्तिशाली इंजिनमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये इंधन-अधिकच्या कार्यक्षमतेसह बाजारात उतरली आहे. इको आपल्या वाहन प्रकारात 93 टक्के वाटा उचलणारे पॅसेंजर आणि व्यावसायिक वापराचे वाहन बनले आहे. आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी इकोचे नाविन्यपूर्णपणे मॉडेल बाजारात आणले आहे.
आरामदायी आणि प्रशस्त फॅमिली कार आणि व्यावहारिक वाहनाची गरज पूर्ण करेल असे बदल केले आहेत. प्रगत पॉवरट्रेन, सुधारित मायलेज आणि नवीन वैशिष्टय़ांसह ही बहुउद्देशीय व्हॅन नवीन उतरवली असून ती आपल्या क्षेत्रात विक्रीवर वर्चस्व कायम ठेवेल आणि ग्राहकांकडून अधिक प्रशंसा मिळवेल असा कंपनीने आशावाद व्यक्त केला आहे.